Chief Minister of Rajsthan : राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? आमदारांच्या बैठकीत आज होणार निर्णय

Chief Minister of Rajsthan : राजस्थानचा मुख्यमंत्री कोण? आमदारांच्या बैठकीत आज होणार निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार आणि निवडून आल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री सोडणार असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर राजस्थानचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर जोरदार चर्चा सुरू आहेत. यासाठी काँग्रेस हायकमांडने राजस्थानच्या आमदारांची बैठक आयोजित केली आहे. (Chief Minister of Rajsthan)

मोठ्या प्रतिक्षेनंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ते पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दरम्यान, अशोक गहलोत हे काँग्रेस अध्यक्ष झाले तर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? यासाठी काँग्रेस पक्ष जयपूरमध्ये आमदारांची बैठक आयोजित करणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन उपस्थित असतील.

बैठकीबाबत के. सी. वेणुगोपाल यांचे ट्विट (Chief Minister of Rajsthan)

काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या बैठकीबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. वेणुगोपाल या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, काँग्रेस अध्यक्षांनी राजस्थानचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी होत असलेल्या बैठकीसाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांची निवड केली आहे. (Chief Minister of Rajsthan)

मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा (Chief Minister of Rajsthan)

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा आहे. पायलट यांच्याशिवाय आणखी काही चेहरेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. राजस्थानच्या आमदार आणि सचिन पायलट यांच्या दरम्यान भेटी-गाठी वाढल्या आहेत. दरम्यान, अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. दोघांनी एकमेकांवर वारंवार टीकाही केली आहे. यामुळे गहलोत यांना मानणारा वर्ग सचिन पायलट यांना विरोध करण्याची शक्यता आहे. (Chief Minister of Rajsthan)

२४ वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार

काँग्रेस पक्षाला २४ वर्षानंतर गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे. भाजपने राहुल गांधी यांना लक्ष्य करत वारंवार काँग्रेसमध्ये घराणेशाही अशी टीका केली होती. यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे २४ वर्षानंतर काँग्रेस पक्षाला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी खासदार शशी थरूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Chief Minister of Rajsthan)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news