Naresh Mhaske : आदित्य ठाकरे यांनीच मला फोन करून दम दिला; नरेश म्हस्के यांचा गोप्यस्फोट | पुढारी

Naresh Mhaske : आदित्य ठाकरे यांनीच मला फोन करून दम दिला; नरेश म्हस्के यांचा गोप्यस्फोट

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कळवा परिसरात शिवसेना वाढावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. मात्र त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी मला फोन करून जितेंद्र आव्हाड यांना विरोध करू नका असा दम दिला होता. असा गोप्यस्फोट शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी शुक्रवारी (दि.२३) केला. ठाणे येथील शिवसेना हिंदूगर्वगर्जना या कार्यक्रमात ते बोलत होते.

कळवा परिसरात आगामी महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावे या करिता मी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्न करत होतो. त्याकरिता आम्ही मेळावे देखील घेतले होते. एकीकडे महापालिकेच्या कामकाजात, महासभेत राष्ट्रवादी सातत्याने आम्हाला विरोध करत होती. मात्र त्याचवेळी आमचे छोटे सरकार अर्थात आदित्य ठाकरे यांनी मला फोन करून जितेंद्र आव्हाड यांना विरोध करू नका असा दम दिला होता. असे म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आपल्या भाषणात सांगितले.

दरम्यान या कार्यक्रमात पुढे बोलताना म्हस्के म्हणाले की, मला वेळोवेळी राष्ट्रवादीला विरोध नको म्हणून दम देण्यात आला आहे. परिणामी एकीकडे राष्ट्रवादी विरोधी भूमिका घेत असताना आम्ही मूग गिळून गप्प बसायचे का? अशी माझी स्थिती झाली होती. बीकेसी येथील मेळाव्यात ठाणे या एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून ३० हजार जणांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासंदर्भात नगरसेवकांनाही सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button