Gold Prices Today : रुपयाची घसरण आणि डॉलर मजबूत झाला असतानाही शनिवारी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली. शुद्ध सोन्याच्या (२४ कॅरेट) दरात शनिवारी ५३० रुपयांची वाढ होऊन ते प्रति १० ग्रॅम ५०,७३० रुपयांवर पोहचले. शुक्रवारी शुद्ध सोन्याचा दर ५०, २०० रुपयांवर जाऊन बंद झाला होता. २२ कॅरेट सोन्याच्या दरातही ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ४६,५०० रुपयांवर गेला आहे. तर चांदीचा दर कमी होऊन तो प्रति किलो ५६,८०० रुपयांवर आला आहे.
मुंबईत आणि कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ५०,७३० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोने ४६,५०० रुपये आहे. दिल्लीत २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ५०,८९० रुपये आणि ४६,६५० रुपये आहे. चेन्नईत २४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ५०,९५० रुपये आणि ४६,७०० रुपये आहे. सोन्याचे दर शहरनिहाय बदलतात आणि ते राज्य सरकारकडून आकारले जाणारे कर आणि शुल्क यावर अवलंबून असतात.
शुक्रवारी वायदे बाजारात सोन्याचा दर सहा महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचला होता. काल प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ४९, २५० रुपयांवर होता. MCX वर सोन्याचा भाव १.२ टक्क्यांनी घसरून ४९,३९९ रुपये तर चांदी ३ टक्क्यांनी घसरून ५६,२७५ रुपये प्रति किलो होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी मजबूत डॉलरच्या तुलनेत सोन्याची झळाळी कमी झाली होती. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याज दरवाढीचा परिणाम शेअर बाजार, रोखे किमती, कमोडिटीज आणि क्रिप्टोकरन्सीवर झाला आहे. या सर्वांची घसरण सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर अडीच वर्षातील निचांकी पातळीवर गेला होता. न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी सोन्याचा भाव १,६६० डॉलर प्रति औंसच्या खाली होता. त्यानंतर सोन्याचा भाव १,६३९ डॉलर प्रति औंसवर स्थिर झाला होता. (Gold Prices Today)
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.
हे ही वाचा :