Gold prices Today : सोने- चांदी दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळा दर | पुढारी

Gold prices Today : सोने- चांदी दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळा दर

Gold prices Today : पितृपक्षात सोन्याची मागणी कमी होते. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. यामुळे देशातील सराफा बाजारात सोन्याचे दर कमी होऊ लागले आहेत. शुद्ध सोन्याचा दर गुरुवारी ५० हजारांच्या खाली आला. आज गुरुवारी २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४९,९१८ रुपयांवर आला. तर चांदीचा दर प्रति किलो ५६,२५६ रुपयांवर खुला झाला.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,९१८ रुपये, २३ कॅरेट ४९,७१८ रुपये, २२ कॅरेट ४५,७२५ रुपये, १८ कॅरेट ३७,४३९ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २९,२०२ रुपयांवर खुला झाला होता.

मजबूत झालेला अमेरिकन डॉलर आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून मोठ्या व्याजदर वाढीच्या शक्यतेने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव गुरुवारी दोन आठवड्यांच्या निचांकी पातळीवर गेले होते. स्पॉट गोल्ड दर ०.३ टक्क्याने घसरून होऊन दर प्रति औंस १,६९१ डॉलरवर आला. अमेरिकेच्या वाढत्या व्याजदरांबाबत सोन्याचा दर अत्यंत संवेदनशील मानला जातो. यामुळे सोन्याच्या दरावर सध्या परिणाम दिसून येत आहे.

Gold prices Today शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button