Weather Forecast : मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस सुरु आहे. विशेषतः दादर आणि रावळी कँप परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान, आज (दि.२४) आणि उद्या (दि.२५) कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या भागांत २७ सप्टेंबर पर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. काल शुक्रवारी कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, आज शनिवारी (दि. २४) अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील २ दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
उत्तराखंड २५ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हरियाणा आणि राजस्थानच्या पूर्व भागातही मुसळधारेची शक्यता आहे. सध्या मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु आहे. मान्सून राजस्थानमधील बिकानेर, जोधपूर येथून परतीच्या मार्गावर आहे.
मुंबई व शहरात शुक्रवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सकाळी पुन्हा हजेरी लावली. सकाळी 7 ते 8 या तासाभरात रावळी कॅम्प येथे सर्वाधिक 28 मिमी तर सायन माटुंगा येथे 21 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व पश्चिम उपनगरातही तासाभरात मुसळधार पाऊस झाला.
मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून पडत असलेल्या पावसाने काल (शुक्रवार) थोडी उसंती घेतली. सकाळी आकाश निरभ्र असल्यामुळे ऊन पडले होते. अधून मधून पडलेली एखादी सर वगळता संपूर्ण दिवसभर पाऊस नव्हता. दरम्यान आज (शनिवार) पहाटेपासून पुन्हा पावसाने मुंबईत हजेरी लावली. सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस झाला. काही सकल भागात पाणी साचले होते, मात्र याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र पावसामुळे वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या (लोकल) मात्र वेळापत्रकानुसार सुरू होत्या. (Weather Forecast)
हे ही वाचा :