पुढारी ऑनलाईन – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI Lite ही सेवा लाँच केली आहे. याच्या मदतीने लहान व्यवहार पटकन करता येणार आहेत. UPI lite वरून २०० रुपयापर्यंतची रक्कम कोणत्याही पीन आणि इंटरनेट सेवेशिवाय पाठवता येणार आहेत. UPT Lite ही ऑन डिव्हाईस वॉलेट सेवा असेल. या वॉलेटमध्ये तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत. या भरलेल्या पैशातून रक्कम पाठवली जाणार आहे. सध्या फक्त डेबिट व्यवहार यातून होणार असून क्रेडिट झालेली रक्कम बँक खात्यात जाईल.
हे ऑन डिव्हाईस वॉलेट असल्याने यातून पैसे पाठवण्यासाठी इंटरनेटची गरज पडत नाही. UPT Lite ची निर्मती ही लहान व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या २००रुपये पर्यंतची रक्कम या UPT Lite वरून पाठवता येणार आहे. UPI Lite फिचर Bhim अॅपमध्ये देण्यात आले आहे. UPI Lite या वॉलेटमध्ये एका वेळी २००० रुपये जमा करता येतील. किती व्यवहार करायचे याचे कोणतेही निर्बंध नाहीत. UPI Lite वरून पैसे पाठवयाचे झाले तर इंटरनेट लागणार नाही, पण वॉलेटमध्ये पैसे जमा करण्यासाठी इंटरनेट लागणार आहे.
हेही वाचा