Congress president election | अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार

Congress president election | अशोक गेहलोत काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan CM Ashok Gehlot) हे काँग्रेसचे अध्यक्ष (Congress president election) होण्याची शक्यता आहे. पण यामुळे त्यांना राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गेहलोत यांना सोनिया गांधी यांचे उमेदवार म्हणून पाहिले जाते. त्यांनी जयपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून निवडून आलो तरीही राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवण्याची भूमिका गेहलोत यांनी यापूर्वी घेतली होती. पण राहुल गांधी यांनी नवीन पक्षप्रमुखांना "एक व्यक्ती एक पद" तत्त्वाचे पालन करावे लागेल असे जाहीर केल्यानंतर गेहलोत यांनी एकावेळी दोन पदांवर राहण्याचा आग्रह सोडून दिला आहे.

दरम्यान, मी पक्षाध्यक्ष झालो तर काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन आणि सोनिया गांधी पुढील कार्यवाही ठरवतील, असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. गेहलोत म्हणाले, "मी (काँग्रेस अध्यक्षपदासाठी) निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे. मी लवकरच उमेदवारी अर्ज भरणार आहे. देशातील सध्यस्थिती पाहता विरोधी पक्ष मजबूत असणे गरजेचे आहे."

गेहलोत पुढे म्हणाले की, मी त्यांना (काँग्रेस खासदार राहुल गांधी) अनेकवेळा काँग्रेस अध्यक्ष होण्याचा सर्वांचा प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती केली. पण त्यांनी स्पष्ट केले की गांधी घराण्यातील कोणीही पक्षाचा प्रमुख होऊ नये.

नेतृत्वाची निवड आणि खासदार शशी थरूर यांच्या विरुद्धच्या संघर्षात आघाडीवर असलेले गेहलोत बुधवारी सचिन पायलट यांच्या प्रमाणेच कोची येथील भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी यांच्यासोबत काही तासांसाठी सामील झाले.

काँग्रेसने पक्षाध्यक्ष निवडीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान नामनिर्देशनपत्रे दाखल होतील. जर आवश्यकता भासल्यास १७ ऑक्टोबर रोजी मतदान होईल आणि १९ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यासाठी २४ ते ३० सप्टेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत मुदत आहे. तर १ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. पात्र उमेदवारांची यादी १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी प्रसिद्ध केली जाईल.

अर्ज मागे घेण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. उमेदवारांची अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाईल. जर आवश्यकता भासल्यास १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ दरम्यान सर्व प्रदेश काँग्रेस कमिटी मुख्यालयात मतदान होईल. निवडणूक निकाल १९ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार असल्याचे काँग्रेसचे निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.

देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस आता मोठ्या बदलाच्या दिशेने जात आहे. दशकानंतर गांधी कुटुंबीयांबाहेरचा अध्यक्ष पक्षाला मिळू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या सध्याच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच पक्षातले वरिष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत आग्रह केला आहे. दरम्यान, शशी थरुर यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. (Congress president election)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news