

पुढारी ऑनलाईन : काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो साेशल मीडियावर शेअर केला जात आहे. ज्यामध्ये ते DSLR कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्त्यांचे फोटो काढताना दिसत आहेत; परंतु यामधील कॅमेराचे लेन्स कव्हर हे मात्र बंद असलेले दिसत आहे. हा फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जाणून घेवूया या फाेटाेमागील सत्य
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा फोटो महाराष्ट्र काँग्रेस सेवा दल, उत्तर प्रदेशचे काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार वीरेंद्र चौधरी, काँग्रेस नेते आमन दुबे, इशिता सेधा आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फाेटो शेअर करताना, युपीचे काँग्रेस आमदार वीरेंद्र चौधरी यांनीही फोटो शेअर करत 'अशा बंद कॅमेऱ्याने कोण फोटो काढतो' असे म्हटलं , तर काँग्रेसचे सुनीलल अहिरे यांनी अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली.