‘काफिर’ आणि गोहत्येवर RSS प्रमुख भागवत मुस्लिम विचारवंतांना काय म्हणाले?

‘काफिर’ आणि गोहत्येवर RSS प्रमुख भागवत मुस्लिम विचारवंतांना काय म्हणाले?
Published on
Updated on

नवी दिल्ली – देशातील ५ मुस्लिम विचारवंतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. देशातील सध्याच्या वातावरणाबद्दल भागवत आणि मुस्लिम विचारवंत यांच्यात चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी बऱ्याच बाबींवर चर्चा झाली.
भारताचे निवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्यासह इतर चार मुस्लिम विचारवंतांनी बुधवारी (दि.२१) भागवत यांच्याशी ७५ मिनिटे चर्चा केली. देशातील वाढत्या असहिष्णू वातावरणाबद्दल काळजी व्यक्त करण्यात आली, अशी माहिती कुरेशी यांनी NDTVशी बोलताना दिली आहे. (RSS Chief With Muslim Leaders)

"भागवत यांनीही देशातील वातावरणाबद्दल आनंदी नसल्याचे सांगितले. सध्या जे घडत आहे, ते चांगले नाही. एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय आपण प्रगती करू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे," असे कुरेशी यांनी सांगितले.
भागवत यांनी काही मुद्दे मांडले. त्यातील एक गोहत्येचा तर दुसरा काफीर या शब्दाचा होता. "हिंदूना गाय पूजनीय आहे, तर काफिर म्हणवणे हिंदूना अपमानकारक वाटते," असेही भागवत म्हणा‍ल्याचे कुरेशी यांनी सांगितले.

कुरेशी म्हणाले, "गोहत्येवर देशभरात बंदी आहे. मुस्लिम कायदा पाळणारे आहेत. जर कुणी कायदा मोडत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे मत आम्ही मांडले. तर काफिर हा शब्द मुस्लिमेतरांसाठी वापरला जाणारा अरबी शब्द आहे; पण तो आता अपमानकारक झाला असेल तर त्याचा वापर थांबवण्यात आम्हाला काहीच हरकत नाही,"

मुस्लिमांना पाकिस्तानी आणि जिहादी म्हटले जाते आणि त्यांच्या राष्टनिष्ठेवर शंका घेतली जाते, हे चुकीचे असल्याचे कुरेशी आणि इतरांनी सांगितले. "यावर सर्व भारतीयांचा 'डीएनए' एकच आहे. बहुतेक मुस्लिम हे धर्मांतरित आहेत, असे भागवत म्हणाले," अशी माहिती कुरेशी यांनी दिली. या भेटीत कुरेशी यांच्यासमवेत दिल्लीचे माजी नायब राज्यपाल नजीब जंग, अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू जमीर उद्दिन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दिकी आणि व्यावसायिक सईद शेरवानी उपस्थित होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news