सर्वोच्च न्यायलयाचे सर्व आदेश ई-कोर्ट अॅपवर लवकरच उपलब्ध होणार

सर्वोच्च न्यायलयाचे सर्व आदेश ई-कोर्ट अॅपवर लवकरच उपलब्ध होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल लवकरच ई-कोर्ट या अॅपवर उपलब्ध होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेपासूनचे (१९५०पासून) सर्व निकाल तपशील आणि आकडेवारीसह ई-कोर्ट या अॅपवर उपलब्ध होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ई-कोट हे मोबाईवर अॅप्लिकेशनवरही उपलब्ध असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या ई-सिमितीने या ई-कोर्टबाबतच्या निर्णयाला हिरवा कंदिल दाखवला आहे. नॅशनल इन्फॉमेटिक्स सेंटर (NIC) ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून प्रयत्न करत आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसाठी संसाधनाच्या उपलब्धतेत मोठी सुधारणा होणार आहे. कारण आतापर्यंतचे निकाल फक्त मनुपात्रा, SCC ऑनलाइन आणि इतर कायदेशीर पोर्टल्स सारख्या सशुल्क वेबसाइट्स वर उपलब्ध होते.

उच्च न्यायालयाचे ७५ लाखांहून अधिक निर्णय या अॅपवर उपलब्ध आहेत. यामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचाही समावेश होणार आहे. लवकरच सर्वोच्च न्यायालयाबाबची सर्व माहिती या अॅपवरती उपलब्ध होईल. न्यायाधीश डि.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाची ई-समिती या निर्णयावर काम करत आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news