Amarinder Singh : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा ‘भाजप’मध्ये प्रवेश | पुढारी

Amarinder Singh : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा ‘भाजप’मध्ये प्रवेश

पुढीरी ऑनलाईन डेस्क : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी आज (१९ सप्टेंबर) त्यांच्या कार्यकर्त्यांसह भााजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी त्यांचा पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष देखील भाजपमध्ये विलीन केला आहे. मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि किरेन रिजूजू यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली. माध्यमाशी बोलत असताना त्यांनी अशी माहिती दिली की, पंजाबच्या भविष्याचा विचार करून पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमची आणि भाजपची विचारधारा एकच असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

पंजाबमध्ये अकाली दलापासून फूट पडल्यानंतर, भाजप येथे बऱ्याच काळापासून एका मजबूत शीख चेहऱ्याच्या शोधात होता. जो पंजाबमध्ये पक्षाला राजकीय बळ देऊ शकेल. कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजपच्या या बाबीमध्ये तंतोतंत बसतात. कारण ते पंजाबच्या राजकारणातील अनुभवी नेते आहेत. त्यांनी राज्यातील शीख आणि हिंदू दोन्ही समुदायांमध्ये मजबूत पकड राखली आहे.

पंजाबच्या राजकारणात कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे नाव खूप मोठे आहे. पंजाबबाहेर देशातील इतर राज्यांमध्ये देखील त्यांचा संपर्क आहे. त्यांच्या माध्यमातून पंजाबला मोठा राजकीय संदेश देण्याचा आणि 2024 च्या निवडणुकीत त्यांच्या राजकीय अनुभवाचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची एकजुटीची जडणघडण सुरू असताना अमरिंदर सिंह यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश ही वेळ खूप महत्त्वाची आहे. त्यांचा प्रवेश करून घेत भाजप पंजाबमध्ये सक्रीय होत असताना दिसून येत आहे.

हेही वाचा

Back to top button