Morning Consult : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते | पुढारी

Morning Consult : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते

नवी दिल्ली, नवी दिल्ली : अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म माॅर्निंग कन्सल्टच्या (Morning Consult) सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगातील ‘सर्वात आवडता नेता’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणानुसार अप्रुव्हल रेटिंग घेण्यात आलं होतं. त्यात जगातील महत्वाच्या नेत्यांची यादी होती, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथम स्थान मिळवलेलं आहे.

डेटा इंटेलिजन्स फर्म माॅर्निंग कन्सल्टच्या (Morning Consult) सर्वेक्षणात नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटिनचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन यांनाही मागे टाकलं आहे. या सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदींना एकूण ७० टक्के अप्रुव्हल रेटिंग मिळालेलं असून जगातील पहिल्या १३ नेत्यांना मिळालेल्या रेटिंगमध्ये मोदींचं रेटिंग हे सर्वाधिक आहे.
Morning Consult
या सर्वेक्षणात असं सांगितलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेत्यांच्या तुलनेत चांगलं काम करत आहेत. मोदींनंतर दुसऱ्या क्रमाकांवर असणाऱ्या मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेजे मॅन्युअल लोपे ओब्रॅडर यांनी ६४ टक्के रेटिंग मिळालं आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर इटालियन पंतप्रधान मारिओ द्रागी यांना ६३ टक्के रेटिंग मिळालेलं आहे.
जर्मनीच्या चॅन्सेलर अजेंला मर्केल यांना ५२ टक्के असून चौथा, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ४८ टक्के रेटिंग मिळालेलं असून त्यांचा ५ वा क्रमांक लागतो. मागील वर्षी या सर्वेक्षणात नरेंद्र मोदींना ८४ टक्के अप्रुव्हल रेटिंग मिळालेलं होतं. त्यावेळी भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होता.
‘माॅर्निंंग कन्सल्ट’ संस्थेबद्दल… 
मॉर्निंग कन्सल्ट ही एक राजकीय गुप्तचर संस्था आहे. ही संस्था सद्यस्थितीत ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स मधील सरकारी नेत्यांचे कामकाज, त्यांच्याद्वारे जागतिक स्तरावर घेण्यात आलेल्या निर्णयांसह त्यांच्यासाठी अप्रूवल रेटिंगचं निरीक्षण करते.
मॉर्निंग कन्सल्टची अप्रुव्हल रेटिंग यादी
नरेंद्र मोदी – ७० टक्के, लोपे ओब्रॅडर –  ६४ टक्के, मारियो द्राघी – ६३ टक्के, एंजेला मार्केल – ५३ टक्के, जो बायडेन – ४८ टक्के, स्कॉट मॉरिसन –  ४८ टक्के, जस्टिन ट्रूडो – ४५ टक्के, बोरिस जॉनसन – ४१ टक्के, जेर बोल्सोनॅरो – ३९ टक्के, मून जे-इन – ३८ टक्के, पेड्रो सांचेज – ३५ टक्के, इमॅनुएल मॅक्रों – ३४ टक्के, योशिहिदे सुगा – २५ टक्के…

Back to top button