Net Direct Tax : देशातील निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात २३ टक्क्यांची वाढ. सकल कर संकलन ३०% वाढले | पुढारी

Net Direct Tax : देशातील निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात २३ टक्क्यांची वाढ. सकल कर संकलन ३०% वाढले

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – देशातील निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात २३ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानी दिली आहे. १७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ७ लाख ६६९ कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे. (Net Direct Tax ) २०२१-२२ मध्ये हे प्रमाण ५ लाख ६८ हजार १४७ कोटी एवढे होते. चालू आर्थिक वर्षातील निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात ३ लाख ६८ हजार ४८४ कोटी कॉर्पोरेशन कराचा (सीआयटी) तसेच ३ लाख ३० हजार ४९० कोटींचा सिक्युरिटिज व्यवहार करासह वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करांचे सकल संकलन गेल्या आर्थिक वर्षांतील ६ लाख ४२ हजार २८७ कोटींच्या तुलनेत ८ लाख ३६ हजार २२५ कोटी झाले आहे. या कर संकलनात ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा झालेल्या सकल कर संकलनात ४ लाख ३६ हजार २० कोटी काॅर्पोरेशन कराचा (सीआयटी) आणि ३ लाख ९८ हजार ४४० कोटी सिक्युरिटीज व्यवहार करासह (एसटीटी) वैयक्तिक प्राप्तिकराचा (पीआयटी) समावेश आहे.

Net Direct Tax : १७ टक्क्यांनी अधिक कर संकलन

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत अग्रिम कर संकलन २ लाख ९५ हजार ३०८ कोटी झाले असून गतवर्षी याचा काळात झालेल्या २ लाख ५२ हजार ७७ कोटी आगाऊ कर संकलनाच्या तुलनेत ही वाढ १७ टक्क्यांनी अधिक आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button