Cheetah Project : 8 चित्ते आले; पण 8 वर्षांत 16 कोटी नोकऱ्या का आल्या नाहीत? राहुल गांधीचा पंतप्रधानांना सवाल  | पुढारी

Cheetah Project : 8 चित्ते आले; पण 8 वर्षांत 16 कोटी नोकऱ्या का आल्या नाहीत? राहुल गांधीचा पंतप्रधानांना सवाल 

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे. त्यांनी एक फोटो शेअर करत ट्विट केले आहे की,  ‘8 चित्ते आले, (Cheetah Project) आता हे सांगा,  8 वर्षांत 16 कोटी नोकऱ्या का आल्या नाहीत? तरुणांसमोर आव्हान आहे, ते रोजगाराचे’. यावेळी त्यांनी  राष्ट्रीय बेरोजगार दिवस असा हॅशटॅग दिला आहे.

नामिबियातून आठ चित्ते भारतात काल (शनिवार, दि.१७) आणण्यात आले. यामध्ये पाच मादी आणि तीन नर आहेत. विशेष बोईंग 747-400 विमानानं या चित्यांना नामिबियाहून ग्वालेर (मध्य प्रदेश) आणण्यात आलं. ग्वाल्हेरहून त्यांना हेलिकॉप्टरने कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलं. सलग 20 तासांत 8,000 किलोमीटरचा प्रवास या चित्यांनी केला. या चित्यांसोबत नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं (CCF) एक पथक होतं. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (KNP-केएनपी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष बंदोबस्तात या चित्यांना सोडण्यात आले. या प्रोजेक्टवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टिका केली आहे. त्यांनी ट्विट करत त्यांनी रोजगारा संदर्भात पंतप्रधानांना सवाल केला आहे की, तरुणांसमोर आव्हान आहे, ते रोजगाराचे’, ‘8 चिते आले, आता हे सांगा,  8 वर्षांत 16 कोटी नोकऱ्या का आल्या नाहीत?

हेही वाचलंत का? 

Back to top button