हॉटेलच्या व्यवस्थापकावर कोयत्याने वार करून लूट; हडपसरमधील घटना

हॉटेलच्या व्यवस्थापकावर कोयत्याने वार करून लूट; हडपसरमधील घटना

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गल्ल्यातील 24 हजारांची रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री काळेपडळ भागात घडली. दुचाकीवरून आलेल्या चौघांनी ही मारहाण केली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमीर तांबोळी (वय 24, रा. कुंजीरवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. 15) रात्री आठच्या सुमारास काळेपडळ येथील हॉटेल पिंगारा येथे ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबोळी हे हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहतात. रात्री हॉटेल बंद करून निघण्याच्या तयारीत होते. याचवेळी दोन दुचाकीवरून चौघे तेथे आले. त्यांनी हातातील कोयता तांबोळी यांच्या मानेला लावून त्यांना धमकी दिली तसेच त्यांच्या खांद्यावर कोयत्याचा वार करून गल्ल्यातील 24 हजारांची रोकड घेऊन आरोपी पसार झाले. मारहाणीत तांबोळी जखमी झाले आहेत. तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news