Mobile Snatching :  मोबाईल चोराला चालत्या ट्रेनला लटकवत १५ किमी नेले; चोर करु लागला विनंती; व्हिडिओ व्हायरल 

Mobile Snatching
Mobile Snatching
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  तुमच्या आजूबाजूला कोणाचा मोबाईल चोरीला (Mobile Snatching ) गेला आहे, मोबाईल चोराला पकडले, मोबाईल चोराला जमावाने चोप दिला असं बऱ्याच वेळा पाहिलं, ऐकलं किंवा वाचलं असेल पण कधी चोराला चालत्या ट्रेनला लटकवत नेले असे कधी ऐकले आहे का? अशीच घटना बिहारमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (Viral Video)

बिहारमध्ये चालत्या ट्रेनमध्ये खिडकीतून एक चोर मोबाईल हिसकावून घेत असतानाच प्रवाशाने प्रसंगावधान बाळगत त्या चोराचा हाथ ताकदीने पकडला. चोराचा हात पकडल्यावर हे प्रकरण चोराच्या जीवावर चांगलेच बेतले आहे. ही मोबाईल चोरी त्याला महागात पडली आहे. चालत्या ट्रेनमुळे चोर अक्षरश: १५ किलोमीटर फरपटत गेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो चोर प्रवाशांना विनंती करत आहे की मला सोडू नका.

Mobile Snatching : "हात सोडू नका, मी मरेन"

व्हायरल व्हिडिओमधील चोर हा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील सांगण्यात आले आहे. माहितीनुसार बेगुसराय मध्ये चालत्या ट्रेनमध्ये खिडकीतून प्रवाशांच्या हातातील मोबाईल चोरी जीवावर बेतली आहे. मोबाईल चोरत असतानाच मोबाईल मालकाने त्या चोराचा हात ताकदीने पकडले त्यानंतर आजूबाजूच्या प्रवाशांनीही त्या चोराचे हात पकडले.

प्रवाशांनी चोराचा हात पकडला होता तेव्हा सुरुवातीला तो प्रवाशांना हात सोडा माझा म्हणून विनंती करत होता. पण जसं-जसं रेल्वेने वेग धरला तसा तो चोर 'माझा हात सोडू नका' अशी विनवणी करू लागला. "हात नका सोडू माझा नाहीतर मी मरेन" असं तो स्थानिक भाषेत विनवणी करू लागला. या चोराला बेगुसरायमधील साहेबपूर स्टेशनपासून खगडियां स्टेशनपर्यंत लटकवत नेलं होतं. खगडियापर्यंत गेल्यावर चोराला सोडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी त्याला माहिती विचारली असता त्याने आपले नाव 'पंकज कुमार' असे सांगितले. तो बेगुसराय मधील साहेबपूर जवळ राहणारा आहे. त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या चोराला व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरलं होत आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news