बाबा रामदेवांच्या पतंजलीमध्ये कोरोना घुसला! | पुढारी

बाबा रामदेवांच्या पतंजलीमध्ये कोरोना घुसला!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदमध्ये कोरोना अखेर घुसला आहे. पतंजलीच्या दुग्ध व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बन्सल यांचे कोरोनाने निधन झाले.  ५७ वर्षीय सुनील बन्सल यांचा १९ मे रोजी मृत्यू झाला. सुनील बन्सल यांच्या सहकाऱ्यांच्या हवाल्याने द प्रिंटने याबाबत वृत्त दिले आहे. 

वृत्तानुसार, उच्च संसर्गामुळे सुनील यांच्या फुफ्फुसाला संसर्ग झाला होता. त्यांना ब्रेन हॅमरेजही झाला होता.  त्यांनी १९ मे रोजी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  सुनील यांनी २०१८ मध्ये पदभार स्वीकारला. २०१८ मध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदमधील दुग्ध व्यवसायाची जबाबदारी डेअरी सायन्स तज्ज्ञ सुनील बन्सल यांच्याकडे होती. त्यावेळी पतंजलीने पनीरसह पॅकेज केलेले दूध, दही, ताक आणि इतर दूध उत्पादने विक्रीची योजना जाहीर केली. 

ईसीएमओ मशीनवर बसवले होते

सुनील यांच्या एका मित्राने आणि माजी बॉसने सांगितले की, त्यांना गेल्या काही दिवसांपासून ईसीएमओवर ठेवले गेले होते. जेव्हा त्याचे हृदय किंवा फुफ्फुसे कार्य करणे थांबवतात तेव्हा रुग्णाला ईसीएमओ किंवा एक्स्ट्राकोरपोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन मशीनवर ठेवले जाते. त्यानंतर ईसीएमओ मशीन काम करताना हृदय आणि फुफ्फुसांना आधार देते.
अ‍ॅलोपॅथीविषयी बाबा रामदेव यांच्या विधानामुळे खळबळ उडाली होती.

अ‍ॅलोपॅथी औषधे आणि कोरोनाबद्दल बाबा रामदेव यांच्या विधानाने बरीच खळबळ उडाली आहे. त्याचवेळी स्वतःचे सीईओ सुनील यांच्या कोरोनाने मृत्यू झाल्याची बातमी चर्चेत आली आहे. शनिवारी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) योगगुरू बाबा रामदेव यांच्यावर अ‍ॅलोपॅथी उपचाराविरूद्ध खोटा प्रचार केल्याचा आरोप केला.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी रविवारी एक पत्र लिहून बाबा रामदेव यांना निवेदन मागे घेण्यास सांगितले. हर्षवर्धन म्हणाले होते की आरोग्य कर्मचारी आणि अ‍ॅलोपॅथीशी संबंधित डॉक्टर मोठ्या प्रयत्नाने कोरोना रूग्णांचे प्राण वाचवत आहेत. आपल्या वक्तव्यामुळे कोरोनाविरूद्ध सुरू असलेला लढा कमकुवत होऊ शकतो. आशा आहे की आपण आपले विधान मागे घ्याल.

यावर रामदेव यांनी रविवारी आरोग्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर देताना सांगितले की आपण हे प्रकरण शांत करू इच्छितो. पत्र प्राप्त झाल्याचे त्यांनी सोशल मीडियातून सांगितले. त्यासंदर्भात, वैद्यकीय पद्धतींच्या संपूर्ण विवादास विराम देऊन मी माझे विधान मागे घेतो.


 

Back to top button