काेलकातामध्‍ये भाजपच्‍या माेर्चाला हिंसक वळण : जमावाची पोलिसांवर दगडफेक, वाहनांची जाळपोळ | पुढारी

काेलकातामध्‍ये भाजपच्‍या माेर्चाला हिंसक वळण : जमावाची पोलिसांवर दगडफेक, वाहनांची जाळपोळ

कोलकाता : पुढारी ऑनलाईन ; पश्‍चिम बंगालमध्‍ये भाजपने काढलेल्‍या भ्रष्‍टाचारविरोधी मोर्चाला हिंसक वळण लागले. भाजपच्‍य वतीने पश्‍चिम बंगाल विधानसभेवर मोर्चाचे ( नबन्‍ना चलो मार्च ) आयोजन करण्‍यात आले होते. हा मोर्चा पोलिसांनी अडवला. भाजपच्‍या नेत्‍यांना अटक करण्‍यात आली. यानंतर या मोर्चाला हिंसक वळण लागले. कोलकातामधील लालबाजार परिसरात आंदोलकांनी दगडफेक करत पोलिसांची व्हॅन पेटवून दिली. हिंसक जमावाला पांगविण्‍यासाठी पोलिसांनी लाठीमार करत अश्रूधुरांच्‍या कांड्या फोडल्या.

पश्‍चिम बंगाल विधानसभेवर काढण्‍यात आलेला मोर्चा पोलिसांनी सांतरागछी रेल्‍वे स्‍टेशन जवळ अडवला. येथे भाजप नेते शुभेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चटर्जी यांच्‍यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते यांना ताब्‍यात घेण्‍यात आले. पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी या उत्तर कोरियाच्‍या हुकुमशाहसारखा कारभार करत आहेत, असा आरोप यावेळी अधिकारी यांनी केला. तर पश्‍चिम बंगाचे पोलीस हे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, असा आरोप दिलीप घोष यांनी केला.

भाजपच्‍या नेत्‍यांना अटक झाल्‍यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत पोलीस व्‍हॅन पेटवली. राणीगंज आणि बोलपूरमध्‍ये पोलिस आणि भाजप कार्यकर्ते यांच्‍यात हाणामारी झाली. भाजपने पश्‍चिम बंगाल मंत्रालयास तिन्‍ही बाजूंनी घेरण्‍याची रणनीती आखली होती. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्ते नेते आणि कार्यकर्ते यांना रस्‍त्‍यातच रोखले. मंत्रालय परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.

हेही वाचा : 

 

Back to top button