BJP incharge | भाजपमध्ये मोठे फेरबदल, विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, पंकजा मुंडे यांच्याकडे नवीन जवाबदारी | पुढारी

BJP incharge | भाजपमध्ये मोठे फेरबदल, विनोद तावडे, प्रकाश जावडेकर, पंकजा मुंडे यांच्याकडे नवीन जवाबदारी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी काही राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा आणि २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमी भाजपने पक्षाअंतर्गत मोठे फेरबदल (BJP incharge) केले आहेत. नवीन बदलानुसार भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची केरळ प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतीच १४ राज्यांच्या प्रभारींची नियुक्ती केली आहे. बिहारचे माजी आरोग्य मंत्री मंगल पांडे यांची पश्चिम बंगाल तर ओम माथूर यांची छत्तीसगड राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे मुरलीधर राव यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. मध्य प्रदेशात पंकजा मुंडे आणि डॉ. रमाशंकर कथेरिया यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. भाजपने राज्यांसाठी नवीन नियुक्त केलेल्या प्रभारींमध्ये लक्ष्मीकांत वाजपेयी यांना झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. बिप्लब कुमार देब यांना हरियाणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर,राधामोहन अग्रवाल यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.

आमदार विजय रुपानी यांना पंजाबचे प्रभारी तर डॉ. नरेंद्र सिंह रैना यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण-दीवचे प्रभारी खासदार विनाडे सोनकर यांना करण्यात आले आहे. खासदार राधामोहन अग्रवाल यांची लक्षद्वीपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरूण चुघ यांना तेलंगणाचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर अरविंद मेनन यांची तेलंगणाचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने अरुण सिंह यांना राजस्थानचे प्रभारी केले आहे. राजस्थानमध्ये विजया रहाटकर सहप्रभारी असतील.खासदार महेश शर्मा यांना त्रिपुराचे प्रभारी बनवण्यात आले आहे.

पंकजा मुंडेंकडे पुन्हा सहप्रभारीपद

२०२० साली भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिव अशी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशाची सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा मध्य प्रदेशात सहप्रभारी अशी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती. पण पंकजा मुंडे यांना राज्यापासून दूर ठेवत केंद्रीय राजकारणात ठेवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा मानस असल्याचे दिसून येत आहे. (BJP incharge)

हे ही वाचा :

Back to top button