भारतीय रेल्वेने मालवाहतुकीत ७.८६ टक्क्यांनी केली वाढ

भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय रेल्वेने गेल्या महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक ११९.३२ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. ऑगस्ट २०२१ च्या तुलनेत ही मालवाहतूक ८.६९ दशलक्ष टनने जास्त आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ ७.८६% नोंदवण्यात आल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. रेल्वेने ९.२ दशलक्ष टन कोळसा, ०.७१ दशलक्ष टन खते, ०.६८ दशलक्ष टन उर्वरित इतर वस्तू आणि ०.६२ दशलक्ष टन कंटेनर इतकी अधिक मालवाहतूक केली आहे.

वाहनांच्या वाहतुकीतील वाढ ही २०२२-२३ आर्थिक वर्षातील मालवाहतूकीचे आणखी एक वैशिष्ट असून २०२२-२३ या आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत २,२०६ वाहतूक करण्यात आली. गतवर्षी याच कालावधीत ही संख्या १ हजार ३१४ होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६८% वाढ झाली आहे.

१ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत एकूण मालवाहतूक ६२०.८७ दशलक्ष टन झाली असून २०२१-२२ मधील ५६२.७५ दशलक्ष टनच्या तुलनेत ५८.११ दशलक्ष टन म्हणजेच ही वाढ ०.३२ टक्क्यांनी अधिक आहे. वीज निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवठा ऑगस्टमध्ये १०.४६ दशलक्ष टनने वाढला असून ४४.६४ दशलक्ष टन कोळसा वीज केंद्राना पोहचवण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news