नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : बिहार आणि दिल्लीमधील राजकीय हालचाली गतीमान करणारे वृत्त आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सोमवार, ५ सप्टेंबरपासून तीन दिवस दिल्ली दौरा करण्याची शक्यता आहे. या वेळी ते विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील.या पार्श्वभूमीवर त्यांचा दिल्ली दौर्याला राजकीय महत्त्व आले आहे.
उपचारासाठी विदेश दौर्यावर असणार्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी याही या दरम्यान देशात परणार असून, त्यांचीही ते भेट घेतील असे वृत्त आहे. विरोधी पक्षांना एकत्रीत करण्यासाठीच नितीश कुमार यांचा दिल्ली दौरा असेल, असे मानले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार हे ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत दिल्ली दौर्यावर असतील. जनता दल संयुक्त ( जेडीयू ) पक्षाचे ज्येष्ठ नेते केसी त्यागी यांनी म्हटलं आहे की, नीतीश कुमार लवकर देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांची एकजुटीसाठी देशव्यापी अभियान राबविणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा दिल्ली दौर्याला राजकीय महत्त्व आले आहे.
हेही वाचा :