मणिपूरमध्ये भाजपचा ‘खेला’; जदयूचे ५ आमदार भाजपमध्ये | पुढारी

मणिपूरमध्ये भाजपचा ‘खेला’; जदयूचे ५ आमदार भाजपमध्ये

पुढारी ऑनलाईन डेस्क: मणिपूरमध्ये नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडला मोठा धक्‍का भाजपने दिला आहे. बिहारप्रमाणे जदयूचे आमदार मणिपूर भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा असतानाच जदयूचे ६ पैकी ५ आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपचा हा मोठा ‘खेला’ मानला जात आहे.

विधानसभा सचिवांनीही या संदर्भात अधिसूचना जारी करून सर्व आमदारांना याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार हे ५ आमदार आता भाजपचे मानले जातील, असेही या अधिसूचनेत म्हटले आहे. बिहार सरकारमधील भाजपसोबतची युती तोडल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मणिपूरमधूनही आम्ही भाजपला असलेला पाठिंबा काढणार आहोत, असे सुतोवाच केले होते, पण घडले अगदी उलट आहे. याआधी अरुणाचल प्रदेशमधील एकमेव जदयू आमदार २५ ऑगस्टरोजीच भाजपमध्ये सहभागी झालेला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button