Asia Cup IND vs HK : विराट-सुर्यकुमारची वादळी खेळी, हाँगकाँग समोर 193 धावांचे आव्हान | पुढारी

Asia Cup IND vs HK : विराट-सुर्यकुमारची वादळी खेळी, हाँगकाँग समोर 193 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेच्या दुस-या सामन्यात भारताचा मुकाबला हाँगकाँग संघाशी आहे. हाँगकाँगचा कर्णधार निझाकत खानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 192 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 68 धावा कुटल्या. त्याचवेळी विराट कोहलीने 44 चेंडूत 59 धावा फटकावल्या. कोहलीने 6 महिने आणि 11 डावांनंतर अर्धशतक झळकावले आहे. विराटने 18 फेब्रुवारी 2022 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. त्या सामन्यात त्याने 41 चेंडूत 52 धावा केल्या होत्या. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 32 महिन्यांनंतर T20 क्रिकेटमध्ये सलग 3 सामन्यांमध्ये 10 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. शेवटच्या वेळी जानेवारी 2020 मध्ये सलग 3 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून 10 पेक्षा जास्त धावा आल्या.

हाँगकाँगविरुद्ध केएल राहुलचा फ्लॉप शो कायम राहिला. त्याने 39 चेंडूत 36 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा कमी होता.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हाँगकाँगविरुद्धही मोठी इनिंग खेळू शकला नाही. त्याने केएल रहुलसोबत चांगली सुरुवात केली, पण तो 12 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. त्याची विकेट भारतीय वंशाच्या आयुष शुक्लाने घेतली.

रोहितचा विश्वविक्रम…

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हाँगकाँगविरुद्ध पहिली धाव घेताच विश्वविक्रम केला. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3500 धावा करणारा रोहित जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

भारताचा संघ…

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

हाँगकाँगचा संघ…

निझाकत खान (कर्णधार), यासीम मोर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेनी (विकेटकीपर), झीशान अली, हारून अर्शद, एहसास खान, मोहम्मद गझनफर, आयुष शुक्ला

Back to top button