अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्‍या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्‍स | पुढारी

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्‍या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्‍स

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :   सुकेश चंद्रशेखर याच्‍या २०० काेटी रुपये खंडणी वसुलीप्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला दिल्‍लीतील पटियाला हाऊस न्‍यायालयाने  समन्‍स बजावले आहे.  २६ सप्‍टेंबर रोजी न्‍यायालयात हजर राहण्‍याचे आदेश तिला देण्‍यात आले आहेत. याप्रकरणी १२ सप्‍टेंबर रोजी दिल्‍ली पोलीस तिची चौकशी करणार आहेत. दरम्‍यान, याप्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्‍या दोषारोपपत्रात जॅकलीनला आरोपी करण्‍यात आले आहे. तसेच तिची सात कोटी २७ लाख रुपयांची मालमत्ताही जप्‍त करण्‍यात आली आहे.

मनी लॉड्रिंगप्रकरणी अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिला ५.७१ कोटी रुपयांच्‍या भेटवस्‍तु दिल्‍या होत्‍या. तसेच सुकेशने जॅकलिनच्‍या नातेवाईकांनाही महागड्या भेटवस्‍तू दिल्‍या होत्‍या. यामध्‍ये अलिशान कार, महागड्या वस्‍तू यांचा समावेश हाेता. सुकेश सध्‍या दिल्‍ली येथील कारागृहात आहे. या काळातही त्‍याने एका महिलेच्‍या २००कोटी रुपयांवर डल्‍ला मारला होता. याच पैशातून त्‍याने जॅकलिन फर्नांडिस हिला कोट्यवधी रुपयांच्‍या भेटवस्‍तू दिल्‍या हाेत्‍या, असे ईडीच्‍या तपासात स्‍पष्‍ट झाले हाेते.

सुकेश याने हे सर्व पैसे मनी लॉड्रिंगमधून कमवले होते. सुकेश चंद्रशेखर व त्‍याच्‍या पत्नीसह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. यानंतरच्‍या पुरवणी आरोपपत्रात जॅकलीनच्‍या नावाचा समावेश करण्‍यात आ. सुकेश चंद्रशेखर याने अभिनेत्री जॅकलीन (Jacqueline Fernandez) हिला ५२ लाख रुपयांचा घोडा आणि चार मांजरं भेट म्हणून दिली होती. या मांजरांची किंमत प्रत्येकी ९ लाख रुपये एवढी होती. त्याने महागडे दागिने आणि महागड्या भेटवस्तू जॅकलीनला दिल्याचे ईडीच्‍या दोषारोपपत्रात नमूद करण्‍यात आले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button