तीन दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा | पुढारी

तीन दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा

श्रीनगर :  जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ येथे मंगळवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या तिघा दहशतवाद्यांचा खात्मा केला. नागबल भागात तीन दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना खबर्‍यांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी नागबल भागाला वेढा दिला असता दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी थांबण्याचा इशारा केला. तथापि, त्याकडे दुर्लक्ष करून ते तेथून पळून जाऊ लागले. यावेळी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात तिघेही ठार झाले. त्यांच्याकडून शस्त्रे जप्‍त करण्यात आली आहेत. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असावेत असा संशय सुरक्षा दलांना असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे.

Back to top button