देशभरात कोरोना रुग्णसंख्येत ९ हजार ४३६ ने वाढ | पुढारी

देशभरात कोरोना रुग्णसंख्येत ९ हजार ४३६ ने वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: सरत्या चोवीस तासात कोरोना रुग्णसंख्येत 9 हजार 436 ने वाढ झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून रविवारी देण्यात आली. याच कालावधीत 30 लोकांचा मृत्यू झाला असून सक्रिय रुग्णांची संख्या 86 हजार 591 पर्यंत खाली आली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 4 कोटी 44 लाख 8 हजार 132 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 5 लाख 27 हजार 754 वर गेला आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.19 टक्के इतके आहे. दुसरीकडे रिकव्हरी दर 98.62 टक्क्यांच्या आसपास स्थिर आहे. चोवीस तासात सक्रिय रुग्णसंख्येत 720 ने घट नोंदवली गेली आहे. दैनिक व साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर क्रमशः 2.93 आणि 2.70 टक्क्यांवर आहे. कोरोनातून बरे झालेल्या एकूण लोकांची संख्या 4 कोटी 37 लाख 93 हजार 787 वर गेली आहे. तर मृत्यूदर 1.19 टक्के इतका आहे. कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने आतापर्यंत 211.66 कोटी डोसेस देण्यात आले असल्याची माहितीही आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button