Malaika Arora : मलायकाचा अर्जूनसोबत 'छैय्या-छैय्या’... 🥰❤️ | पुढारी

Malaika Arora : मलायकाचा अर्जूनसोबत 'छैय्या-छैय्या’... 🥰❤️

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा ( Malaika Arora )  तिच्या फॅशन सेंन्स आणि जिम लूकमुळे चर्चेत असते. मलायका आणि तिचा बॉयफ्रेंड अर्जून कपूर हे नेहमी रेस्टॉरंट, पार्टी या रम्य ठिकाणी स्पॉट होत असते. सध्या मलायाका आणि अर्जून फॅशन डिझायनर कुणाल रावलच्या पार्टीत स्पॉट झाले आहेत. या पार्टीतील दोघांचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर कुणाल रावल आणि अर्पिता मेहता दोघेजण आज लग्नबंधनात अडकणार आहेत. कुणाल रावलने शनिवारी प्री-वेडिंग पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक स्टार्संनी हजेरी लावली. यात बॉलिवूडचे क्यूट कपल मलायका
( Malaika Arora ) आणि अजून कपूरदेखील पोहोचले.

या पार्टीतील वरुण धवन रॅपर आणि गायक बादशाहसोबत स्टेजवर ‘गर्मी’ या गाण्यावर डान्स करताना दिसला. यासोबतच मलायका आणि अर्जूनचा एक रोमॉन्टिक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मलायका आणि अर्जून बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या ‘छैय्या-छैय्या’ या गाण्यावर थिरकताना दिसले. यातील खास म्हणजे, छैय्या-छैय्या गाण्यावर या दोघांनी मनसोक्त डान्स करताना मलायकाने अर्जूनला किस केलं आहे. यावेळी मलायकाने पांढऱ्या रंगाचा लेहंगा तर अर्जूनने ब्लॅक रंगाची शेरवानी परिधान केली होती. या पार्टीतील काही फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहेत. या व्हिडिओतील दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. यात एका युजर्सने ‘क्यूट कपल’ ‘दोघांची केमिस्ट्री खूपच भारी आहे’, ‘Beautiful❤❤ malaika🔥🔥’, ‘काय शोधतेस? मी येथेच आहे🥰❤️’, ‘So beautiful 💖’, ‘Beautiful 🔥’, ‘Hottt 🔥’, ‘WOW’, ‘Such a pretty babe❤️’, ‘Very beautiful’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे. हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रानवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यत जवळपास १ लाख ३० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. या पार्टीत अर्जुन- मलायकासोबत रकुल प्रीत सिंह, जान्हवी कपूर, जॅकी भगनानी, वरुण धवन, नताशा दलाल या स्टार्संनी हजेरी लावली होती.

(video : viralbhayani and photo : malaika arorao instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Varun Dhawan TBT (@varundhawantbt)

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button