नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सरत्या चोवीस तासात कोरोना रुग्ण संख्येत 9 हजार 531 ने वाढ झाली असून 26 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य खात्याकडून सोमवारी देण्यात आली. (Corona Update) सक्रिय रुग्णांची संख्या एक लाखाच्या खाली म्हणजे 97 हजार 648 वर आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 4 कोटी 43 लाख 48 हजार 960 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तर मृतांचा एकूण आकडा 5 लाख 27 हजार 368 वर गेला आहे.
एकूण रुग्णांच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.22 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. दुसरीकडे रिकव्हरी दर 98.59 टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. कोरोनाचा दैनिक सक्रियता दर 4.15 टक्क्यांवर असून साप्ताहिक सक्रियता 3.59 टक्के इतका नोंदवला गेला आहे. (Corona Update) गेल्या चोवीस तासात 2 लाख 29 हजार 546 कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या. कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या आता 4 कोटी 37 लाख 23 हजार 944 पर्यंत वाढली आहे. मृत्यूदर 1.19 टक्क्यांच्या आसपास स्थिर आहे. कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत 210.02 कोटी प्रतिबंधक डोसेस देण्यात आले असल्याचेही आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?