दिल्ली दंगलीप्रकरणी चौघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचे सत्र न्यायालयाचे निर्देश | पुढारी

दिल्ली दंगलीप्रकरणी चौघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचे सत्र न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या भीषण दंगलीप्रकरणी चौघांजणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिले. दंगल, जाळपोळ करणे, आगी लावणे, स्फोटकांचा वापर आदी कलमे आरोपींविरोधात लावण्यात आलेली आहेत. चारही आरोपींनी 25 फेबु्रवारी 2020 रोजी पार्किंगमध्ये जाउन वाहनांची जाळपोळ केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

शाहरुख, अशवानी, आशू आणि जुबेर अशी चार आरोपींची नावे आहेत. दुसरीकडे करीम आणि खलीद अन्सारी यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याने त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करु नये, असे अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती अमिताभ रावत यांनी सांगितले. दिल्लीतील आंबेडकर कॉलेजवळ असलेल्या पार्किंग लॉटमध्ये दीडशे ते अडीचशे लोकांच्या जमावाने वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली होती. यातील चार आरोपींची ओळख पटली असून त्यानुसार त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.

 

Back to top button