पुढारी ऑनलाईन : सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Delhi's Deputy CM Manish Sisodia) यांच्या निवासस्थानासह दिल्ली-एनसीआरमधील २१ ठिकाणी छापे टाकले आहेत. दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणाची (Excise policy case) सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. 'मुझे तुम्हारी साज़िशें तोड़ न सकेंगी' असे ट्विट करत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सीबीआयच्या कारवाईला ठोस प्रत्युत्तर दिले आहे.
मनीष सिसोदिया यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मला तुमचे हे राजकीय कारस्थान तोडू शकत नाही. दिल्लीतील लाखो मुलांसाठी मी या शाळा बांधल्या आहेत. या लाखो मुलांच्या आयुष्यात आलेलं हसू हीच माझी ताकद आहे. तुमचा हेतू जरी मला कमजोर करण्याचा असला तरी… माझा हेतू हा आहे, असे म्हणत दिल्ली शिक्षण मंत्रालयाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
दिल्ली सरकारच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण आणि आरोग्याचे चांगले काम बंद पडावे असा यांचा हेतू आहे. म्हणूनच दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सत्य काय आहे ते न्यायालयात बाहेर येईलच असेही सिसोदियांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचलंत का?