

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मागील चोवीस तासांत कोरोना रुग्ण संख्येत 15 हजार 754 ने वाढ झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून शुक्रवारी देण्यात आली. याच कालावधीत 47 लोकांचा कोरोनाने (Corona Update) बळी घेतला. ताज्या आकडेवारीनुसार कोरोनाने बाधित झालेल्या लोकांची एकूण संख्या आता 4 कोटी 43 लाख 14 हजार 618 वर गेली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 5 लाख 27 हजार 253 वर पोहोचला आहे.
(Corona Update) सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 830 इतकी आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत 487 ने वाढ नोंदवली गेली आहे. एकूण बाधितांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.23 टक्के इतके आहे. तर रिकव्हरी दर 98.58 टक्के इतका आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या लोकांची एकूण संख्या 4 कोटी 36 लाख 85 हजार 535 वर पोहोचली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार 18 ऑगस्टरोजी 4 लाख 54 हजार 491 लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. देशाची राजधानी दिल्ली आणि केरळपाठोपाठ मुंबईमध्ये कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. दिल्लीमध्ये सरत्या चोवीस तासात कोरोना रुग्ण संख्येत 1964 ने वाढ झाली. शहरातील सक्रियता दर 9.42 टक्के इतका आहे. आतापर्यंत दिल्लीत 19 लाख 90 हजार 355 लोकांना कोरोना झाला असून 26 हजार 408 लोकांचा बळी गेला आहे.
हेही वाचलंत का ?