पुढारी ऑनलाइन डेस्क : सध्या बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांविरोधात नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. अनेक हिंदूवादी संघटना भावना दुखावल्याने वेगवेगळ्या चित्रपटांना बॉयकॉट करण्याचे सोशल मीडियावर आव्हान करतात. अनेकदा या ट्रेंडचा परिणाम चित्रपटांवर होत आहे. आमीर खानच्या लालसिंग चढ्ढा नंतर त्याला सपोर्ट करणा-या सगळ्यांच्याच चित्रपटांना बॉयकॉट करण्याचा ट्रेंड नेटक-यांनी सुरू केला आहे. यामध्ये आता अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या 2:12 Do Baaraa या चित्रपटाला बॉयकॉट करण्याचे आवाहन आहे. #BoycottDobaara हा ट्रेंड सध्या ट्वीटरवर जोरात टैग करत आहे.
अनुराग कश्यप दिग्दर्शित तापसी पन्नू मूख्य भूमिकेत असणारा 2:12 Do Baaraa चित्रपट सध्या वादाच्या भव-यात अडकला आहे#BoycottDobaara. एका मुलाखतीत तापसी पन्नू हीने म्हटले आहे की तुम्ही माझा चित्रपट बॉयकॉट करून दाखवाच#BoycottDobaara. तापसीचा हा अहंकारी अॅटिट्यूड न आवडल्याने अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. तसेच तिच्यावर टिका करीत डोन्ट वरी आम्ही नक्कीच तुझा चित्रपट बॉयकॉट करू, अशा कमेंट्स टाकल्या आहेत तर एकाने अरे तुला #BoycottDobaara ची गरज नाही. तुझे चित्रपट असेही बघण्यासारखे नसतात त्यामुळे ते आपोआपच बॉयकॉट #BoycottDobaara होतात.
तर अनुराग कश्यपने लोकांकडे पैसे नसल्याने ते माझे चित्रपट बघत नाही. या वक्तव्यावर नेटक-यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. यात एकीने म्हटले आहे. लोकांकडे पैसे आहेत पण तुझ्या सी ग्रेड मुव्ही पाहण्यात त्यांना त्यांचे पैसे वाया घालायचे नाहीत आणि #BoycottDobaara केले आहे.
तर काहींनी थेट बॉलीवूडलाच बॉयकॉट करण्याचे आवाहन केले आहे. #BoycottDobaara #BoycottBollywood असे ट्रेंड ट्वीटर आणि अन्य सोशल मीडियामध्ये शेअर केले जात आहे. अनेकांनी त्यांच्या या मोहिमेला प्रतिसाद दिल्याचेही दिसते. तर बॉयकॉटमुळे चित्रपटाला आर्थिक नुकसानीच्या झळा सोसाव्या लागत आहे. आमीरच्या लालसिंग चढ्ढा चित्रपटाला #BoycottLlasinghchaddha या ट्रेंडमुळे त्याच्या कमाईला फटका बसला आहे. आता #BoycottDobaara #BoycottBollywood हे नवीन ट्रेंड आहे.
हे ही वाचा :