Watsonville plane crash | अपघाताचा थरार! कॅलिफोर्नियात दोन विमानांची आकाशात टक्कर, दोघांचा मृत्यू, पहा व्हिडिओ

Watsonville plane crash | अपघाताचा थरार! कॅलिफोर्नियात दोन विमानांची आकाशात टक्कर, दोघांचा मृत्यू, पहा व्हिडिओ
Published on
Updated on

कॅलिफोर्निया; पुढारी ऑनलाईन : कॅलिफोर्नियात विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात दोन विमानांची आकाशातच टक्कर झाली. यामुळे ही विमाने कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वॉटसनविले (Watsonville plane crash) म्युनिसिपल विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली आहे. एक इंजिन असलेले सेसना १५२ (Cessna 152) आणि दोन इंजिन असलेल्या सेसना ३४० (twin-engine Cessna 340) या दोन विमानांची आकाशात टक्कर झाली. सेसना १५२ मध्ये एक व्यक्ती होती. तर सेसना ३४० मध्ये दोन व्यक्ती होत्या, अशी माहिती फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) एका निवेदनातून दिली आहे.

या दुर्घटनेत जीवितहानी झाली असल्याची पुष्टी वॉटसनविले (Watsonville) अग्निशमन विभागाने केली आहे. पण जमिनीवरील कोणीही जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या अपघाताची चौकशी करत आहे. वॉटसनविले म्युनिसिपल विमानतळ सॅन जोसच्या दक्षिणेस सुमारे ४५ मैलांवर आहे. (Watsonville plane crash)

वॉटसनविले शहरातील एका फोटोमध्ये विमानतळावरील एका छोट्या इमारतीचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे, अग्निशामक दल घटनास्थळी बचावकार्य करत आहे. एका प्रथमदर्शीने सांगितले की, दोन विमानांची जेव्हा टक्कर झाली त्यावेळी ती आकाशात सुमारे २०० फूट (६१ मीटर) उंचीवर होती. वॉटसनविले म्युनिसिपल विमानतळावर चार धावपट्ट्या आहेत. याची क्षमता ३०० हून अधिक विमानांची आहे. वॉटसनविलेच्या महापौरांनी सांताक्रूझ काउंटीमधील या अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींबद्दल शोक व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news