पुढारी ऑनलाईन : 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्णदिन. 200 वर्षांहून अधिक काळ ब्रिटिश वसाहतवादापासून आपला देश स्वतंत्र झाला. ब्रिटीश राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी अकल्पनीय वेदना सहन करत प्राणाची आहुती दिली. काहींनी तुरुंगवास साेसत ब्रिटीशांची दडपशाही झुगारली. या सर्वांच्या अमूल्य याेगदानांमुळे आज आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव साजरा करत आहाेत. स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणार्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वातंत्र्याबद्दल काय भावना हाेत्या ते जाणून घेवूया…
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच
बाळ गंगाधर टिळक
शेतकऱ्यांच्या गोठ्यातून, नांगर पकडत तसेच झोपडीतून आणि सफाई कामगारातून नवा भारत निर्माण होऊ द्या.
स्वामी विवेकानंद
स्वातंत्र्य कधीही कोणत्याही किंमतीपेक्षा प्रिय असते. तो जीवनाचा श्वास आहे. जसे माणूस जगण्यासाठी श्वास घेताना किंमत देत नाही. मात्र त्याच्या शिवाय जगूही शकत नाही. स्वातंत्र्यही तसेच आहे.
महात्मा गांधी
मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्या व्यक्तीचे मन मुक्त नसेल, तो साखळदंडात बांधलेला असतो, तो गुलाम असतो, स्वतंत्र माणूस नाही. ज्याचे मन मुक्त नाही, जरी तो तुरुंगात नसला तरी तो कैदी आहे आणि मुक्त मनुष्य नाही. जिवंत असूनही ज्याचे मन मोकळे नाही, तो मृतापेक्षा श्रेष्ठ नाही. मनस्वातंत्र्य हा एखाद्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
अजूनही तुमचं रक्त सळसळत नसेल, तर तुमच्या नसांमध्ये पाणी वाहत असेल.ते तारुण्य काय कामाचं जे मातृभूमीला सेवा देत नसेल. चंद्रशेखर आझाद
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू-ए-कातील में है
रामप्रसाद बिस्मिल
व्यक्तींना मारणे सोपे आहे; परंतु तुम्ही कल्पनांना मारू शकत नाही. महान साम्राज्ये कोसळली, तर कल्पना टिकून राहिल्या भगतसिंग