नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, सर्व गुन्‍हे दिल्‍ली पोलिसांकडे वर्ग करण्‍याचे आदेश | पुढारी

नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, सर्व गुन्‍हे दिल्‍ली पोलिसांकडे वर्ग करण्‍याचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वादग्रस्‍त विधानामुळे वादाच्‍या भोवर्‍यात सापडलेल्‍या भाजपच्‍या माजी प्रवक्‍त्‍या नुपूर शर्मा यांना आज सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलासा दिला. त्‍यांच्‍या विरुद्ध देशातील विविध ठिकाणी दाखल झालेले गुन्‍हे हे दिल्‍ली पोलिसांकडे वर्ग करावेत,  तसेच यापूर्वी १९ जुलैपर्यंत नुपूर शर्मा यांना अटक करुन नये, असा आदेश न्‍यायालयाने दिला होता. ताो कायम ठेवण्‍यात यावा, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

वादग्रस्‍त विधान प्रकरणी नुपूर शर्मा यांच्‍याविरोधात देशात विविध ठिकाणी १० गुन्‍हे दाखल झाले होते. हे गुन्‍हे दिल्‍ली पोलिसांकडे वर्ग करण्‍यात यावे, असा आदेश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला आहे. यापूर्वी १९ जुलै पर्यंत नुपूर शर्मा यांना अटक करुन नये, असा आदेश न्‍यायालयाने दिला होता, तो यापुढेही कायम ठेवण्‍यात आल्‍याचे सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button