ISRO कडून SSLV चे यशस्वी प्रक्षेपण, मात्र सॅटेलाईटशी संपर्क तुटला… | पुढारी

ISRO कडून SSLV चे यशस्वी प्रक्षेपण, मात्र सॅटेलाईटशी संपर्क तुटला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ISRO ने आज रविवारी सकाळी 9.18 सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथून विद्यार्थ्यांच्या टीम आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान इनक्यूबेटर ‘स्पेस किड्स इंडिया’ द्वारे विकसित केलेला आझादीसॅट आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS02 घेऊन जाणारा पहिला SSLV चे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. मात्र, सॅटेलाइटशी संपर्क तुटला आहे. सॅटेलाईटकडून डेटा मिळणे बंद झाले आहे.

ISRO : विद्यार्थ्यांनी बनवलेला ‘आझादीसॅट’ घेऊन पहिल्या ‘SSLV’ ची अंतराळात झेप (पाहा व्हिडिओ)

तसे पाहता आपले सॅटेलाईटस् अंतराळात सोडण्यासाठी ‘इस्रो’कडून ‘जीएसएलव्ही’ किंवा ‘पीएसएलव्ही’चा वापर केला जातो. मात्र, यावेळी ‘एसएसएलव्ही’चा वापर केला जात आहे. छोट्या सॅटेलाईटस्ना अंतराळात सोडण्यासाठीच हे रॉकेट वापरले जाणार आहे. या रॉकेटची लांबी 112 फूट, व्यास 6.7 फूट आणि वजन 120 टन आहे. या रॉकेटच्या सहाय्याने सुमारे 500 किलो वजनाचे सॅटेलाईटस् पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटपर्यंत (खालील कक्षा) नेले जाऊ शकतात.

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ म्हणाले की, इस्रो मिशन कंट्रोल सेंटर डेटा लिंक मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. लिंक स्थापित होताच आम्ही देशाला कळवू. EOS02 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. जे 10 महिने अंतराळात काम करेल. त्याचे वजन 142 किलो आहे. यात मध्यम आणि लांब तरंगलांबीचा इन्फ्रारेड कॅमेरा आहे. ज्याचे रेझोल्यूशन 6 मीटर आहे. म्हणजेच रात्रीच्या वेळीही ते निरीक्षण करू शकते. AzaadiSAT Satellites हा SpaceKidz India नावाच्या स्वदेशी खाजगी अवकाश संस्थेचा विद्यार्थी उपग्रह आहे. तो देशातील 750 मुलींनी मिळून बनवला आहे.

हे ही वाचा:

ISRO : विद्यार्थ्यांनी बनवलेला ‘आझादीसॅट’ घेऊन पहिला ‘SSLV’ अंतराळात झेपावणार

Isro launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने केले EOS-04 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

 

Back to top button