ISRO : विद्यार्थ्यांनी बनवलेला 'आझादीसॅट' घेऊन पहिल्या 'SSLV' ची अंतराळात झेप (पाहा व्हिडिओ) | पुढारी

ISRO : विद्यार्थ्यांनी बनवलेला 'आझादीसॅट' घेऊन पहिल्या 'SSLV' ची अंतराळात झेप (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : ISRO ने आज रविवारी सकाळी 9.18 सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथून विद्यार्थ्यांच्या टीम आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान इनक्यूबेटर ‘स्पेस किड्स इंडिया’ द्वारे विकसित केलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि आझादीसॅट घेऊन जाणारा पहिला SSLV चे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.

‘इस्रो’ रविवारी लाँच करणार नवे रॉकेट ‘SSLV’

हे रॉकेट अर्थ ऑब्झर्व्हेशनल सॅटेलाईटला (इओएस-02) अंतराळात सोडण्याचे कार्य करील. तसे पाहता आपले सॅटेलाईटस् अंतराळात सोडण्यासाठी ‘इस्रो’कडून ‘जीएसएलव्ही’ किंवा ‘पीएसएलव्ही’चा वापर केला जातो. मात्र, यावेळी ‘एसएसएलव्ही’चा वापर केला जात आहे. छोट्या सॅटेलाईटस्ना अंतराळात सोडण्यासाठीच हे रॉकेट वापरले जाणार आहे. या रॉकेटची लांबी 112 फूट, व्यास 6.7 फूट आणि वजन 120 टन आहे. या रॉकेटच्या सहाय्याने सुमारे 500 किलो वजनाचे सॅटेलाईटस् पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटपर्यंत (खालील कक्षा) नेले जाऊ शकतात.

‘पीएसएलव्ही’ रॉकेट 1750 किलो आणि ‘जीएसएलव्ही’ 4 हजार किलोपर्यंतचे वजन अंतराळात नेऊ शकते. ‘एसएसएलव्ही’ अंतराळात सोडण्याची योजना कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वीच आखण्यात आली होती. मात्र, महामारी व लॉकडाऊनमुळे या योजनेला विलंब झाला. ‘इओएस-02’ हा असा कृत्रिम उपग्रह आहे ज्याच्या माध्यमातून कृषी, वन, भूविज्ञान आणि जल विज्ञानामधील भारताच्या नव्या तंत्रज्ञानाचे दर्शन होऊ शकेल. या मायक्रो सॅटेलाईटला ‘इस्रो’नेच विकसित केले आहे. ‘एसएसएलव्ही’ची ही मोहीम ‘इस्रो’प्रमुख एस. सोमनाथ यांच्याच कल्पनेतून साकारलेली आहे.

Back to top button