Paytm : पेटीएम डाउन, यूजर्संना पेमेंट आणि लॉगइनमध्ये आला अडथळा

Paytm : पेटीएम डाउन, यूजर्संना पेमेंट आणि लॉगइनमध्ये आला अडथळा

पुढारी ऑनलाईन डेस्क  भारतीय पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएम (Paytm) आज डाउन झाले. यामुळे पेटीएमच्या यूजर्संना पेमेंट करता आले नाही. पेटीएम (Paytm) अॅप आणि वेबसाइटवर लॉग इन होत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली. पेमेंट करताना अचानक पेटीएम (Paytm) लॉगआउट झाले. आणि ते पुन्हा लॉग इन होत नव्हते. पेटीएमने या समस्येचे निराकरण केल्यानंतर पेटीएम सेवा पुन्हा कार्यान्वित झाली.

ग्राहकांना 'काहीतरी चूक झाली आहे, कृपया काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा' असे एरर येत होते. अनेक पेटीएम (Paytm) ग्राहकांनी या समस्येबद्दल ट्विटरवर तक्रार नोंदवली. आउटेज डिटेक्शन वेबसाइट डाउन डिटेक्टरने देखील सांगितले आहे की, देशभरातील यूजर्संना पेटीएमसंदर्भात समस्या येत आहेत. देशातील मुंबई, दिल्ली आणि बंगळूर या भागात प्रामुख्याने समस्या येत आहेत.

पेटीएमने लवकरच अधिकृतपणे ट्विटद्वारे अॅपमध्ये 'नेटवर्क एरर' असल्याचे घोषित केले. आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी टीम काम करत असल्याचे सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news