कोल्हापूरचा डंका : युरोपच्या टॉप भारतीय महिला बिझनेस लिडरमध्ये दोघी कोल्हापूरच्या

लीना नायर (डावीकडे) आणि मनाली जगताप
लीना नायर (डावीकडे) आणि मनाली जगताप

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन – कोल्हापूरचा नावलौकिक विविध क्षेत्रात आहे. देशातच नाही तर जगभरात कोल्हापूरच्या व्यक्तींनी नावलौकिक मिळवलेला आहे, आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे Women Entrepreneur India या मासिकाने युरोपमधील इंडियन वुमन लिडर्स इन इंडिया ही यादी जाहीर केलेली आहे. या यादीत मुळच्या कोल्हापूरच्या असलेल्या दोन महिलांचा समावेश आहे.

यात शनेल या फॅशन ब्रँडच्या सीईओ लीना नायर आणि कासुमोच्या कंट्री मॅनेजर मनाली जगताप यांचा समावेश आहे. मनाली जगताप यांनी काही दिवसांपूर्वी नव्या कंपनीत जबाबदारी स्वीकारली असून सध्या त्या योलो या कंपनीसाठी कंट्री मॅनेजर म्हणून काम पाहात आहेत. लीना नायर शनेल या फॅशन ब्रँडची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्या युनिलिव्हर या कंपनीत कार्यरत होत्या. तर मनाली जगताप यांनी काही वर्षांपूर्वी लंडनमध्ये गांधी थाळी सुरू केली होती. महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या खाद्यपद्धतींवर आधारित या गांधी थाळीने जगाचे लक्ष वेधले होते.

लीना नायर आणि मनाली जगताप या दोघींचे शालेय शिक्षण कोल्हापुरातील होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये झाले आहे.
मनाली जगताप यांनी लिंक्डइनवर या संदर्भात माहिती दिलेली आहे. "या यादीत लीन नायर यांचेही नाव आहे. भारतातून आलेल्या सर्वांत यशस्वी बिझनेस लीडरमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्या शाळेतील माझ्या सीनिअर आहेत, शिवाय लहानपणी आम्ही शेजारीही होतो. हा सन्मान मी नम्रपणाने स्वीकारते."

जगताप यांनी त्या पूर्वी काम करत असलेल्या कासुमो या कंपनीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news