5G Spectrum Auction : ५ जी स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रियेतून १.५० लाख कोटींच्या स्पेक्ट्रमची विक्री! | पुढारी

5G Spectrum Auction : ५ जी स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रियेतून १.५० लाख कोटींच्या स्पेक्ट्रमची विक्री!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील ५ जी स्पेक्ट्रम लिलाव प्रकिया सोमवारी संपली.सात दिवस चाललेल्या स्पेक्ट्रम लिलावाच्या शेवटच्या दिवसापर्यंत १ लाख ५० हजार १७३ कोटींच्या स्पेक्ट्रमची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.आतापर्यंतची देशातील सर्वात मोठी लिलाव प्रक्रिया ठरलेल्या या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी १.४५ लाख कोटींच्या निविदा सरकारला प्राप्त झाल्या होत्या. २६ जुलै पासुन सुरू झालेल्या या लिलाव प्रक्रियेत मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल तसेच गौतम अडाणी यांच्या कंपन्यांनी रेडिओ वेव करिता आतापर्यंतची सर्वात मोठ्या लिलावासाठी निविदा सादर केल्या होत्या.

लिलाव प्रक्रियेत जियो तसेच एअरटेल सह अनेक कंपन्यांनी उत्तर प्रदेश पुर्व सर्कल करीता १८०० मेगाहर्ट्स साठी निविदा सादर केली होती.दूरसंचार विभागाने या लिलाव प्रक्रियेत एकूण ४.३ लाख कोटी रुपयांचे ७२ गीगाहर्ट्स स्पेक्ट्रम ची विक्री केली. लिलाव प्रक्रियेत रिलायन्स जिओ, भारती एअरटेल तसेच वोडाफोन-आयडियासह अडाणी एंटरप्रायजेस सहभागी झाले होते. २०२२-२३ दरम्यान ५जी मोबाईल सेवा सुरू होईल, अशी माहिती केंद्र सरकारने नुकतीच लोकसभेत दिली आहे. अशात लिलाव प्रक्रिया संपन्न झाल्याने ५जी सुविधा मिळण्यास आणखी गती प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे.

Back to top button