कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी सरकार राखीव साठा बाजारात आणणार | पुढारी

कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी सरकार राखीव साठा बाजारात आणणार

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकार कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी पुढील महिन्यापासून कांद्याचा राखीव साठा बाजारात आणणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हा कांदा बाजारात आणण्यात येईल. केंद्रीय नागरी पुरवठा मंत्री अश्विन कुमार चौबे यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

यावर्षी केंद्र सरकारने २ लाख ५० टन इतका कांद्याचा राखीव साठा केलेला आहे. २०२२च्या रब्बी हंगमात केंद्राने ही खरेदी केली आहे,

“नियंत्रित पद्धतीने हा कांदा बाजारात आणला जाईल,” असे त्यांनी म्हटले आहे.  खाद्यपदार्थ, पेट्रोल-डिझेल यांची दरवाढ यामुळे भारतातील महागाईचा निर्देशांक वाढलेला आहे. सर्वसाधारणपणे कांद्याचे दर हा देशात राजकीय प्रश्न बनतो. रशिया आणि युक्रेनच्या युद्धानंतर केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लादले होते.

दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विविध उपाय योजते. त्यात साठ्यांवर नियंत्रण ठेवणे, साठेबाजीवर नियंत्रण, निर्यातीवर नियंत्रण असे विविध उपाय योजत असते. डाळी आणि कांद्याचा बफर स्टॉक दर नियंत्रणासाठी केला जातो.

हेही वाचा

Back to top button