

पुढारी ऑनलाईन डेस्क : वादग्रस्त विधानप्रकरणी वादाच्या भोवर्यात सापडलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना आज सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्यांना १० ऑगस्टपर्यंत अटक करु नये, असे स्पष्ट करत न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस बजावली आहे.
वादग्रस्त विधान प्रकरणी भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यांच्यावर देशातील विविध भागात गुन्हेही दाखल झाले होते. अटकेपासून संरक्षण मिळविण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली.
नुपूर शर्मा यांचे वकील मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले "नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना अटक करुन नये. त्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. नुपूर शर्मा यांच्या हत्येचे व्हायरल विधानामुळे तसेच उत्तर प्रदेशातील व्यक्तीने दिलेल्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. नुपूर शर्मा यांना १० ऑगस्टपर्यंत अटक करु नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिली.
हेही वाचा :