Income Tax रिटर्नच्‍या टेन्‍शनमध्‍ये आहात? जाणून घ्‍या, ३१ जुलैपर्यंत ‘रिटर्न’ फाईल न केल्यास किती हाेईल दंड? | पुढारी

Income Tax रिटर्नच्‍या टेन्‍शनमध्‍ये आहात? जाणून घ्‍या, ३१ जुलैपर्यंत 'रिटर्न' फाईल न केल्यास किती हाेईल दंड?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पगारदार, छोटे व्यावसायिक अशांसाठी आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै २०२२ अशी आहे. इनकम टॅक्स कायदा १९६१ सेक्शन १३९ नुसार कंपनी, ज्याचे अकाऊंट ऑडिट व्हावे लागणार आहेत अशा व्यक्ती आणि इतर काही घटक वगळता सर्वांना ३१ जुलै ही शेवटची तारीख असते. (Income Tax Return)

शेवटच्या दिवसाची वाट पाहण्यापेक्षा वेळेत रिटर्न फाईल करणे आवश्यक असते. ३१ जुलैनंतरही रिटर्न फाईल करता येते पण त्यानंतर दंड, व्याज आकारणी सुरू होते.

Income Tax Return : किती आकारला जातो दंड?

३१ जुलैनंतर फाईल होणाऱ्या रिटर्नला Belated Return म्हणतात. २०२१-२२ साठीचे Belated Return फाईल करण्याची मुदत ही ३१ डिसेंबर २०२२ आहे. जर करदात्याचे एकूण उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर ५ हजार रुपये इतका दंड होऊ शकतो. जर हे उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल तर १ हजार रुपये इतका दंड होतो. याशिवाय जर देय कर असेल तर त्यावर व्याजही आकारला जातो.

हेही वाचा : 

Back to top button