पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर चेन्नई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृती विषयी रुग्णालयाने अधिकृत माहिती दिलेले नाही. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या बहुचर्चित 'पोनियिन सेल्वन-1' चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला आहे.
मणिरत्नम यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांच्याना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती सूत्रांनी सांगितले. मणिरत्नम यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पोनियिन सेल्वन-1' चा हिंदी टीझर ८ जुलै रोजी रिलीज झाला होता. हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलगू, मल्ल्याळम आणि कन्नड भाषेत एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे.