Crypto Currency : क्रिप्टो करन्सीवर बंद हवी; आरबीआयची भूमिका | पुढारी

Crypto Currency : क्रिप्टो करन्सीवर बंद हवी; आरबीआयची भूमिका

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : क्रिप्टो करन्सीवर (Crypto Currency) बंदी घालण्यात यावी, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुचवले आहे. पण अशा कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करायची झाली, तर त्याला जागतिक पाठबळ लागेल, असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे. सीतारामन यांनी संसदेत ही माहिती दिली आहे.

त्या म्हणाल्या की, “क्रिप्टो करन्सीचा  (Crypto Currency) परिणाम हा देशाच्या आर्थिक आणि वित्तीय स्थिरतेवर परिणाम करणारा आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याला कायद्याच्या चौकटीत आणावे, असे म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेची भूमिका अशा चलनावर बंदी असली पाहिजे, अशी आहे,” सीतारामन यांनी लेखी स्वरूपात हे उत्तर सादर केले आहे.

पण या चलनांना कोणत्याही सीमेचे बंधन नाही, त्यामुळे बंदीची अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय होऊ शकणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. सध्या केंद्र सरकार Crypto Consultation Paper बनवण्यासाठी कार्यरत आहे. क्रिप्टो करन्सीवर निर्बंध लावणारे विधेयक या पावसाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता होती, पण पावसाळी अधिवेशनात सादर होणाऱ्या विधेयकांत क्रिप्टोबद्दलच्या विधेयकांचा समावेश नाही.

तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःचे डिजिटल चलन बाजारात आणण्यासाठी कार्यरत आहे, जेणे करून इतर डिजिटल चलनाची गरज उरणार नाही.

हेही वाचलंत का ? 

Back to top button