इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात, १२ ठार

इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात, १२ ठार

[visual_portfolio id="263903"]

इंदूर; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात इंदूरहून अमळनेरला जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. बस पुलावरून खाली कोसळून झालेल्या या अपघातात १२ जण ठार झाले आहेत. तर १५ जणांना वाचवण्यात आले आहे. खलघाट संजय सेतू पुलावर हा अपघात झाला असल्याची माहिती मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे. अपघातग्रस्त बस एसटी महामंडळाची आहे.

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात इंदूरहून अमळनेरला जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. बस पुलावरून खाली कोसळून झालेल्या या अपघातात १२ जण ठार झाले आहेत. तर १५ जणांना वाचवण्यात आले आहे. खलघाट संजय सेतू पुलावर हा अपघात झाला असल्याची माहिती मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे. अपघातग्रस्त बस एसटी महामंडळाची आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर येथून अमळनेरला जाणाऱ्या या बसच्या चालकाचे खलघाट संजय सेतू पुलावर वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस थेट नदीत जाऊन कोसळली. घटनास्थळी पोलीस, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे.

अपघाताचे ठिकाण इंदूर पासून ८० किलोमीटर अंतरावर

ही घटना आग्रा- मुंबई (एबी रोड) महामार्गावर झाली आहे. हा मार्ग इंदूरला महाराष्ट्राशी जोडतो. घटनास्थळ इंदोर पासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. ज्या संजय सेतू पुलावर हा अपघात झाला तो धार आणि खरगोन या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. या पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) आणि अर्धा भाग खलटाका (खरगोन) येथे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news