गोवा : बोंडला येथे बस कलंडून 12 जण जखमी | पुढारी

गोवा : बोंडला येथे बस कलंडून 12 जण जखमी

फोंडा; पुढारी वृत्तसेवा :  बोंडला अभयारण्यात सहलीसाठी गेलेल्या जीए02 टी 4711 या क्रमांकाच्या पर्यटक बसगाडीला अपघात झाला. यात बसमधील बाराजण जखमी झाले. हा अपघात संध्याकाळी सातच्या सुमारास घडला.

बसगाडी बोंडलाहून परतत असताना गांजे येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने एका बाजूला कलंडली. जखमींना तिस्क – पिळये येथील इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील सहाजणांना बांबोळी इस्पितळात पाठवण्यात
आले आहे.

Back to top button