Corona Cases : देशभरात १६ हजार ९०६ नवीन कोरोनाबाधितांची भर | पुढारी

Corona Cases : देशभरात १६ हजार ९०६ नवीन कोरोनाबाधितांची भर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात मंगळवारी दिवसभरात १६ हजार ९०६ कोरोनाबाधितांची  (Corona Cases) भर पडली. तर, ४५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान, १५ हजार ४४७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.४९ टक्के नोंदवण्यात आला. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ३.६८ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ४.२६ टक्के नोंदवण्यात आला. देशातील एकूण ४ कोटी ३० लाख ११ हजार ८७४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १ लाख ३२ हजार ४५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २५ हजार ५१९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

देशात कोरोनाविरोधात (Corona Cases)  सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९९ कोटी १२ लाख ७९ हजार १० डोस देण्यात आले आहेत. तर, ३.७६ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले. खबरदारी म्हणून आतापर्यंत ५ कोटी १० लाख ९६ हजारांहून अधिक बुस्टर डोस देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी ९ कोटी ९९ लाख १८ हजार ३३० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात आतापर्यत ८६ कोटी ७७ लाख ६९ हजार ५७४ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ कोटी ५९ लाख ३०२ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button