Sri Lanka crisis : श्रीलंकेला आंतरराष्‍ट्रीय समुदायाने मदत करावी : सोनिया गांधी यांचे आवाहन | पुढारी

Sri Lanka crisis : श्रीलंकेला आंतरराष्‍ट्रीय समुदायाने मदत करावी : सोनिया गांधी यांचे आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
गंभीर आर्थिक व राजकीय संकटाला सामोरे जाणार्‍या श्रीलंकेला ( Sri Lanka crisis) आंतरराष्‍ट्रीय समुदायाने मदत करायला हवी, असे आवाहन काँग्रेसच्‍या अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी केले आहे. श्रीलंकेतील परिस्‍थितीवर त्‍यांनी चिंताही व्‍यक्‍त केली आहे.

श्रीलंकेच्‍या प्रश्‍नावर सोनिया गांधी यांनी एक निवदेन जारी केले. यामध्‍ये म्‍हटले आहे की, श्रीलंकेवर आलेले आर्थिक संकटामुळे येथे प्रचंड महागाई वाढली आहे. जीवनावश्‍यक वस्‍तुंचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्‍य जनतेसमोर कठीण प्रसंग आहे. काँग्रेस पक्ष श्रीलंकेला शक्‍य तेवढी मदत आणि समर्थन देण्‍याचा आग्रह करणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

Sri Lanka crisis : श्रीलंकेतील परिस्‍थितीवर भारताचे लक्ष : परराष्‍ट्र मंत्री

श्रीलंकेमध्‍ये आर्थिक व राजकीय अस्‍थिरता निर्माण झाली आहे. भारत नेहमीच श्रीलंकेचे सहकार्य करत आला आहे. आजही या देशाला मदत करण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहे. श्रीलंका आपल्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहे. आमचे श्रीलंकेतील परिस्‍थितीवर लक्ष आहे, अशी माहिती परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी माध्‍यमांशी बोलताना दिली.

संबंधित बातम्या

हेही वाचा :

 

Back to top button