लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक, राबडीदेवी म्हणाल्या 'प्रार्थना करा' | पुढारी

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक, राबडीदेवी म्हणाल्या 'प्रार्थना करा'

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांच्या अवयवांची हालचाल थांबली असल्याची माहिती एम्स रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, लालूप्रसाद यांच्या पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी लालूंच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी, असे आवाहन जनतेला केले आहे.

लालूप्रसाद यादव यांना प्रकृती जास्तच बिघडल्याने बुधवारी रात्री त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला आणण्यात आले होते. लालूंच्या प्रकृतीवर डॉक्टरांच्या पथकाचे लक्ष असून संपूर्ण शरीराची चिकित्सा करण्यात आल्यावर उपचार केले जाणार असल्याचे लालू यांचे पुत्र तेजस्वी यांनी स्पष्ट केले आहे.

चालू आठवड्याच्या सुरुवातीला लालू यादव पाटणामधील आपल्या घरात शिडीवरून खाली पडले होते. डोक्यात दुखापत झाल्याने त्यांची तब्येत चिंताजनक बनली आहे. लालूंना तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले असून शरीराची हालचाल थांबली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी यादव यांना दूरध्वनी करून लालूंच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

Back to top button